‘पुरुषांना संकेत देते’, सर्वांसमोर नरगिसने रेखावर केलेले आरोप, इंडस्ट्रीमध्ये उडालेली खळबळ

रेखा पुरुषांना संकेत देते, नरगिसने सर्वांसमोर रेखावर केलेले गंभीर आरोप. नवरा सुनील दत्तसोबत काय होतं नेमकं कनेक्शन? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 03, 2026 | 1:35 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीच्या चकचकीत जगामागे अनेक वाद आणि चर्चित किस्से दडलेले आहेत. अशाच एका जुन्या वादाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, ज्यात दिग्गज अभिनेत्री नरगिस दत्त यांनी अभिनेत्री रेखाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात सुनील दत्त यांचं नावही जोडल्याने हा वाद अधिकच गाजला होता.

2 / 5
1950 च्या दशकात नरगिस दत्त या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिले आणि सहकलाकारांसाठी उभं राहण्याची प्रतिमा निर्माण केली. दुसरीकडे, 1970-80 च्या दशकात रेखा आपल्या करिअरच्या शिखरावर होती. तिची सुंदरता, अभिनय आणि वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असायचं.

3 / 5
रेखाने सुनील दत्तसोबत ‘प्राण जाए पर वचन ना जाए’, ‘नागिन’, ‘राखी की सौगंध’ आणि ‘जमीन आसमान’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं. या चित्रपटांमधील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. मात्र, याच काळात रेखा आणि सुनील दत्त यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगू लागल्या, ज्यामुळे नरगिस दत्त नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.

4 / 5
1976 साली दिलेल्या एका मुलाखतीत नरगिस दत्त यांनी रेखाबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, 'रेखा पुरुषांना असे संकेत देते की ती सहज उपलब्ध आहे' याशिवाय त्यांनी आणखी कठोर शब्द वापरत रेखाच्या स्वभावाबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि तिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा इशाराही दिला. या वक्तव्यामुळे त्या काळात चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती.

5 / 5
या सर्व आरोपांनंतरही रेखाने कधीही सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिली नाही. ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत राहिली. त्या वेळी ती फक्त 22 वर्षांची होती आणि इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत होती.

Follow Us