
ग्रहांच्या चालीत बदल झाल्याने राशीच्या जन्मकुंडलीवर त्याचा परिणाम होतो. जानेवारीमध्ये मकर संक्रांतीनंतर मंगळ ग्रहाच्या राशीपरिवर्तनाची वेळ आली आहे. मंगळ शुक्रवारी मकर राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर सकाळी ४ वाजून ३६ मिनिटांनी होईल. मंगळाचा हा गोचर अनेक राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहे. मंगळ ग्रह २३ फेब्रुवारी पर्यंत मकर राशीत राहील आणि नंतर कुंभ राशीत गोचर करेल. मंगळाच्या या राशीपरिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घेऊया...

सिंह राशीच्या लोकांना मंगळाच्या गोचरामुळे लाभ होईल. मंगळाचा मकर राशीत प्रवेश सिंह राशीच्या जीवनासाठी उत्तम ठरणार आहे. कुटुंबाचा पूर्ण सहकार्य मिळेल. सामाजिक संबंध चांगले राहतील. काळ शुभ राहील. घाईघाईत कोणतेही निर्णय घेण्यापासून दूर राहा.

मीन राशीच्या लोकांचे धैर्य वाढेल आणि कमाईत वाढ होईल. अध्यात्माकडे ओढ वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आरोग्याच्या दृष्टीनेही मंगळाचा हा गोचर तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांना नशीबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबाकडून चांगले सहकार्य मिळेल. दैनंदिन जीवनात सुख-सुविधा वाढतील. पद-प्रतिष्ठा वाढेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा हा गोचर अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा गोचर शुभ ठरणार आहे. या गोचराच्या परिणामाने मेष राशीच्या जन्मकुंडलीतील लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. कामात प्रगती होईल. मेहनतीचे फळ मिळेल आणि नोकरी-व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल.

या चार राशींवर मंगळाच्या या गोचराचा विशेष शुभ प्रभाव पडणार असून, गुंतवणूक, नोकरी आणि आर्थिक लाभाची शक्यता वाढणार आहे. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)