
ग्रहांचे सेनापती मंगळ यांनी 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. मंगळ राहूवर दृष्टी टाकत आहेत. अशा स्थितीत अंगारक योगाची निर्मिती होत आहे. मंगळ आणि राहू हा योग तयार करत आहेत जो अनेक राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या योगामुळे ३ राशींच्या जातकांवर परिणाम होईल.

ज्योतिषशास्त्रात अंगारक योगाला अशुभ मानले जाते. या ३ राशींच्या जातकांना अशुभ परिणाम भोगावे लागतील. हा अंगारक योग ७ डिसेंबरपर्यंत राहील. तोपर्यंत या तीन राशींनी सावध राहावे. चला, आम्ही तुम्हाला या राशींबद्दल सांगतो.

मंगळ आणि राहू ग्रहाच्या अंगारक योगामुळे कर्क राशीच्या लोकांना अशुभ परिणाम भोगावे लागतील. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे तुमची कामे बिघडू शकतात, म्हणून वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. कोणताही निर्णय घेताना घाई बिलकुल करू नका. विचारपूर्वकच पाऊल उचला.

कुंभ राशीच्या जातकांसाठी अंगारक योग चांगला ठरणार नाही. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. खर्च कमी करा आणि सावध राहा.

मकर राशीच्या जातकांसाठी काळ कठीण राहणार आहे. रागामुळे तुमची वाणी कठोर होऊ शकते, यामुळे नुकसान होईल. संयम ठेवा आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्ही अपघाताचे बळी ठरू शकता, यामुळे दुखापत होऊ शकते. स्वतःची काळजी घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)