सगळेच ऐकतात मात्र या गाण्याचा अर्थ कोणालाच माहित नाही; 17 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, स्टार कलाकरांमुळे बनलं खास

प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक प्रसून जोशी यांनी नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती-18' या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी 'दिल्ली-6' चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्यामागचा खास किस्सा सांगितला. या गाण्याची निर्मिती कशी झाली, याचा रंजक अनुभव त्यांनी शेअर केला.

| Updated on: Nov 15, 2026 | 5:44 PM
1 / 5
'दिल्ली-6' चित्रपटात सोनम कपूरने बिट्टू ही भूमिका साकारली होती. तिच्या पात्राजवळ एक पाळीव कबुतर होते. याच कबुतराच्या नावावरून 'मसकली' हे गाणे तयार झाल्याचे प्रसून जोशी यांनी सांगितले.

'दिल्ली-6' चित्रपटात सोनम कपूरने बिट्टू ही भूमिका साकारली होती. तिच्या पात्राजवळ एक पाळीव कबुतर होते. याच कबुतराच्या नावावरून 'मसकली' हे गाणे तयार झाल्याचे प्रसून जोशी यांनी सांगितले.

2 / 5

प्रसून जोशी म्हणाले, "तो मसकली इतका अडकला, अनेकदा एखाद्या शब्दाची ध्वनी इतकी सुंदर असते की वाटते संपूर्ण जग त्याच्याभोवती फिरत आहे." हे गाणं आहे 'मसकली मसकली उड मटकली...'

3 / 5

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील 'मसकली' गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. मोहित चौहान यांनी हे गाणे गायले असून ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

4 / 5

या गाण्यात कबुतराच्या माध्यमातून स्वातंत्र्य, शांतता आणि उंच भरारी घेण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

5 / 5

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहेत. आजारी आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतून जुन्या दिल्लीत आलेल्या रोशनचा प्रवास यात दाखवला आहे. या प्रवासात त्याला दिल्लीची संस्कृती, परंपरा, जातिभेद आणि धार्मिक तणाव यांचा अनुभव येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us