
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून अस्मिता पाहिली जायची. या मालिकेत अभिनेत्री मयूरी वाघने महत्त्वाची भूमिका साकरली होती. तसेच या मालिकेत पियुष रानडे देखील दिसला होता. दोघेही मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. पण त्यांचे हे लग्न फारकाळ टिकले नाही. आता पहिल्यांदा मयूरी वाघने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

मयूरीने नुकताच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केल्याची भावना व्यक्त केली. तसेच तिने एक प्रसंगही सांगितला आहे.

आपल्याकडे मुलींना शिकवलं जातं की सहान करावं. लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. पण, कधीपर्यंत हे सगळं सहन करायचं हे देखील आपण शिकवायला हवे असे मयूरी म्हणाली.

पुढे मयूरीने एक अनुभव शेअर करत म्हटले की, 'मी त्याच्या सेटवर सरप्राइज द्यायला जायचे आणि तो तिथे नसायचा. कुठे जायचा मला माहिती नाही. मी फोन करायटचे तर उचलायचा नाही आणि मग खूप रँडम स्टोरी ऐकायला मिळायची. गाडी पंक्चर वैगरे झाली, ज्यावर तुम्ही विश्वासही ठेवणार नाही.'

मयूरी आणि पियुषने 2017मध्ये लग्न केले. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. सहामहिन्यातच मयूरीला जाणवले की काही तरी चुकतय. शेवटी तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.