Weather Alert : वादळी वाऱ्यासह धो धो पाऊस, IMD कडून इशारा, महाराष्ट्रात 24 तासात..

Weather Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. पाऊस गेल्याचे चित्र होते. पण आता पुन्हा राज्यात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला.

| Updated on: Nov 02, 2026 | 7:40 AM
1 / 5
राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. ढगाळ वातावरण झाले असून अनेक भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाने मोठा दिलासा मिळाला. सकाळच्या वेळी थंडीही जाणवत आहे.

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. ढगाळ वातावरण झाले असून अनेक भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाने मोठा दिलासा मिळाला. सकाळच्या वेळी थंडीही जाणवत आहे.

2 / 5

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. चक्रीवादळाची प्रणाली तयार झाली. विदर्भासह अनेक भागात आज पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

3 / 5

ठाणे, मुंबईसह रायगडमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यादरम्यान ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सांगली, पुणे आणि सोलापूर येथे पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल.

4 / 5

मराठवाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नांदेड, धाराशिव आणि लातूर या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 3 तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

5 / 5

मागील काही महिने कोरडी केलेली असताना राज्यात पुन्हा आता पाऊस कोसळताना दिसत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पाऊस होईल. अनेक राज्यात चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us