PHOTO | मुंबई मेट्रो 3 । मुंबईतील हेरिटेज क्षेत्रातील मेट्रो बोगदा पूर्ण

| Updated on: Apr 24, 2021 | 9:56 PM

टीबीएम सूर्या-2 ने पॅकेज 1 मधील हुतात्माचौक ते सीएसएमटीपर्यंतच्या डाऊनलाईनचे 569 मीटर अंतर 106 दिवसांत पूर्ण केले. (Mumbai Metro's TBM Surya - 2 records breakthrough at CSMT)

1 / 5
कोरोनाचं संकट आणि त्यामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमध्येही मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुस्साट सुरु आहे.

2 / 5
मेट्रो-3 चा 37 वा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. टीबीएम सूर्या-2 ने पॅकेज 1 मधील हुतात्माचौक ते सीएसएमटीपर्यंतच्या डाऊनलाईनचे 569 मीटर अंतर 106 दिवसांत पूर्ण केले. यासह पॅकेज 1 मधील एकूण 96 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले.

3 / 5
'सूर्या-2' ही टनेल बोरिंग मशीन लार्सन अँड टुब्रो आणि शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी जेव्हीद्वारे ऑपरेट केली जाते. कफ परेड ते छात्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या भुयारीकरणादरम्यान 'सूर्या-2' ही टनेल बोरिंग मशीन चौथ्या बोगद्याचे खोदकाम करणार आहे.

4 / 5
रॉबिन्स क्रॉस ओव्हर एक्सआरइ टीबीएम मशीनने ऑक्टोबर 2020 मध्ये हुतात्मा चौक स्टेशनच्या दक्षिणेला 233  मीटर एनएटीएम माईंड टनेलचे खोदकाम केले होते. त्यानंतर उत्तरेच्या दिशेने भुयारीकरण सुरु करण्यात आले होते.

5 / 5
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने 556 मीटर लांब डाऊन लाईन टनेल बांधण्यासाठी 2 जानेवारी 2021 रोजी चौथ्या असाइन्मेंटसाठी टनेल बोरिंग मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.