
पुणेकरांसाठी, चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांचे मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

पुण्याहून हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानापर्यंत रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना लवकरच मेट्रोने प्रवास करता येईल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पहिला ट्रायल रन यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

मान डेपो ते पीएमआर 4 स्टेशनपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाला. हा 23.3 किलो मीटरच्या हिंजेवाडी-शिवाजीनगर कॉरिडोरचा एक भाग आहे.

या प्रकल्पाचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू आहे. मार्च 2026 पर्यंत मेट्रोचा प्रवास पुणेकरांना करता येण्याची शक्यता आहे.

मेट्रो मार्गिका 3 म्ध्ये एकूण 23 स्टेशन आहे. मेट्रो लाईन 3 हे भारतातील मेट्रो रेल्वेचे पहिले सार्वजनिक -खासगी भागीदारी मॉडेलवर आधारीत आहे. टाटा आणि सिमेन्स कंपनीच्या संयुक्त उपक्रमाद्वारे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल्वे लिमिटेडचे काम सुरू आहे.