
प्रसिद्ध क्रिकेटपटू कायरन पोलार्डने काल अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पोलार्ड सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. पोलार्डच्या निवृत्तीची सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे.

कायरन पोलार्डच्या मुंबई इंडियन्स संघातील स्थानावर प्रसिद्ध समालोचक आणि माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी कायरन पोलार्डवर टीका केली.

आज चेन्नई विरुद्ध मुंबई इंडियन्सचा 'करो या मरो' सामना आहे. या मॅचआधी पोलार्डच्या संघातील स्थानावर संजय मांजरेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

मुंबई इंडियन्सचा रांगेत सहा सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यामागे कायरन पोलार्डच मुख्य कारण असल्याचं संजय मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

यंदाच्या सीजनमध्ये कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्ससाठी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने आतापर्यंत 16.40 च्या सरासरीने फक्त 82 धावा केल्या आहे. गोलंदाजीमध्येही पोलार्ड महागडा ठरला आहे. प्रति षटक 10 धावा देऊन त्याने फक्त एक विकेट काढली आहे.