
‘पॉपचा बादशाह’ किंवा ‘किंग ऑफ पॉप’ म्हणून मायकल जॅक्सन ओळखला जायचा. आज, तो आपल्यामध्ये नसला तरी त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने जवळपास संपूर्ण जगावर राज्य केले. सध्या मायकल जॅक्सनची लेक चर्चेत आहे. तुम्ही तिचे काही खास फोटो पाहिलेत का?

मायकल जॅक्सनच्या लेकीचे नाव पॅरिस जॅक्सन आहे. ती वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे.

पॅरिसने वयाच्या २२व्या वर्षी ‘लेट डाउन’ हे गाणं लॉन्च करत संगीत विश्वात पदार्पण केले. तिचा हा पहिलाच अब्लम चांगला हिट ठरला.

‘लेट डाउन’ हे गाणे पॅरिसने स्वत: लिहिले होते. तसेच मँचेस्टर ऑर्केस्ट्राच्या अँडी हल याने त्याची निर्मिती केली होती.

मायकेल जॅक्सनने आपल्या तिन्ही मुलांना नेहमीच मीडियाच्या आणि जनतेच्या नजरेपासून दूर ठेवलं होतं.

2009 मध्ये मायकेल जॅक्सनच्या निधनानंतर पॅरिस, तिचे भाऊ प्रिन्स आणि बिग जॅक्सन हे त्यांच्या आजी कॅथरीन जॅक्सन यांच्यासोबत राहत होते.

पॅरिस जेव्हा 18 वर्षांची झाली, तेव्हा तिने आपल्या आजीचं घर सोडलं.

आता पॅरिस ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो शेअर करताना दिसते. कधी टॉपलेस तर कधी श्वानासोबत फिरताना तिचे फोटो पाहायला मिळतात.