मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा होईल मोठा स्फोट

मायक्रोवेव्हमध्ये काही वस्तू गरम केल्याने गंभीर अपघात होऊ शकतात, ज्यामुळे आग, धूर किंवा स्फोट होण्याचा धोका असतो. धातू, हवाबंद डबे, अंडी, मिरच्या आणि रिकामा मायक्रोवेव्ह वापरणे टाळावे. दाब वाढल्याने स्फोट, विषारी वायू आणि उपकरणाचे नुकसान होऊ शकते. सुरक्षिततेसाठी या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Updated on: Nov 29, 2025 | 12:28 AM
1 / 6
मायक्रोवेव्ह ओव्हन हा आज प्रत्येक घरातील महत्त्वाचा भाग आहे. कारण यामुळे अन्न गरम करणे सोपे होते. मात्र जर तुम्ही काही वस्तू नकळत मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. ज्यामुळे आग, धूर किंवा स्फोट होण्याची शक्यता असते.

2 / 6
स्टील, अॅल्युमिनियम, लोखंड किंवा कोणत्याही प्रकारच्या धातूमुळे मायक्रोवेव्हमध्ये ठिणग्या (Sparks) निर्माण होऊ शकतात. तसेच फॉइल पेपर मायक्रोवेव्ह किरणांना परावर्तित करतो, ज्यामुळे ठिणग्या वाढतात आणि उपकरणाचा स्फोट होण्याचा धोका असतो.

3 / 6
गरम केल्यावर, हवाबंद प्लास्टिक, काच किंवा स्टीलच्या कंटेनरमध्ये दाब वाढतो. हा वाढलेला दाब सहन न झाल्याने कंटेनरचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे उपकरणाचे नुकसान होते. ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.

4 / 6
कच्ची असो वा उकडलेली, कवच असलेले अंडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवू नये. अंडी गरम होताच, आतमध्ये दाब निर्माण होतो आणि काही सेकंदातच अंडी फुटू शकते, ज्यामुळे लहान स्फोट होऊ शकतो.

5 / 6
हिरव्या किंवा वाळलेल्या मिरच्या मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यातील कॅप्सेसिन नावाचा वायू हवेत सोडला जातो. या धुरामुळे डोळ्यांना त्रास आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो. उच्च तापमानावर यामुळे ठिणग्या देखील निर्माण होऊ शकतात.

6 / 6
मायक्रोवेव्हमध्ये काहीही नसताना ते चालवणे धोकादायक आहे. मायक्रोवेव्हच्या लहरी शोषल्या न गेल्यामुळे त्या मशीनवर परत परावर्तित होतात, ज्यामुळे ठिणग्या निर्माण होऊन उपकरणाचे गंभीर नुकसान होऊ शकते.