100 एकरात मीका सिंहचं आलिशान फार्महाऊस; गुरुद्वारा, हेलिपॅडसुद्धा, 200 लोकांचं बनतं जेवण

मीका सिंहचं हे फार्महाऊस म्हणजे केवळ आलिशान घर नसून संगीत, शेती, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अनोखा संगम असल्याचं या व्लॉगमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे फराह खानच्या या फार्महाऊस टूरने मीका सिंहच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Updated on: Sep 25, 2026 | 9:25 AM
1 / 7
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मीका सिंह आपल्या दमदार आवाजासोबतच त्याच्या हटके लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो. आता त्याच्या दिल्लीतील तब्बल 100 एकर परिसरात पसरलेल्या आलिशान फार्महाऊसची झलक सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मीका सिंह आपल्या दमदार आवाजासोबतच त्याच्या हटके लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो. आता त्याच्या दिल्लीतील तब्बल 100 एकर परिसरात पसरलेल्या आलिशान फार्महाऊसची झलक सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

2 / 7

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने आपल्या युट्यूब व्लॉगमधून मीका सिंहच्या या खास प्रॉपर्टीचा टूर दाखवला. या फार्महाऊसमध्ये सर्व सुखसुविधांसोबतच अध्यात्म, शेती आणि संगीतासाठीही खास जागा तयार करण्यात आली आहे.

3 / 7

फराह खान तिचा कुक दिलीप आणि टीमसोबत मीका सिंहच्या दिल्लीतील फार्महाऊसवर पोहोचली होती. मीका स्वतः गेटवर येऊन त्यांचं स्वागत करताना दिसला. परिसराची भव्यता पाहून फराह खानही प्रभावित झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. जवळपास 100 एकरांवर पसरलेल्या या फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात हिरवळ असून, तिथे शेतीही केली जाते.

4 / 7

मीका सिंहच्या फार्महाऊसची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिथे उभारण्यात आलेला गुरुद्वारा. या गुरुद्वाऱ्यात 24 तास पाठ आणि गुरबाणी सुरू असते. याशिवाय फार्मच्या परिसरात एक छोटं मंदिरही आहे. त्यामुळे या भव्य प्रॉपर्टीत मनोरंजनासोबतच अध्यात्मालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.

5 / 7

या फार्महाऊसमध्ये हेलिपॅडची सुविधाही आहे. त्याशिवाय मीका सिंहने अनेक घोडे आणि काही उंटही पाळले आहेत. आजूबाजूला हिरवळ, शेतं आणि मोकळी जागा असल्यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या रिसॉर्टसारखा दिसतो. फार्ममध्ये मोहरीसह विविध भाज्यांची लागवड केली जाते.

6 / 7

गायकासाठी सर्वात आकर्षक असलेली सुविधा म्हणजे फार्महाऊसमधील खास कॉन्सर्ट स्पेस. रिपोर्टनुसार, या ठिकाणी तब्बल 4 ते 5 हजार लोकांसाठी कार्यक्रम किंवा पार्टी आयोजित करता येते. याशिवाय इथं प्रोफेशनल म्युझिक स्टुडिओही आहे. त्यामुळे मीका आपल्या संगीताच्या दुनियेशी जोडलेला हा परिसर काम आणि मनोरंजनासाठीही वापरतो.

7 / 7

फार्महाऊसमध्ये ओपन किचनचीही खास व्यवस्था आहे. पारंपरिक पद्धतीने चुलीवर जेवण बनवलं जातं. फार्ममध्ये गाय-म्हशी असून त्यांच्या दुधापासून तयार होणाऱ्या तुपाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. या फार्मवर दररोज जवळपास 200 लोकांसाठी जेवण बनतं, तर रात्री सुमारे 50 लोक तिथे मुक्काम करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us