
सध्या वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या बनले आहे. वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केली जातात. मात्र, तुम्हाला जर खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आहारात थोडा बदल करा.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दररोजच्या आहारात थोडे बदल केले तरीही तुम्ही वजन आरामात कमी होईल.

जवळपास लोक जेवणात गव्हाची चपाती खातात. मात्र, गव्हाच्या चपातीमुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी जेवणात गव्हाची चपाती खाणे टाळावे.

बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरी आणि ज्वारी दोन्ही पचनासाठी हलक्या असतात. शिवाय यांच्यामध्ये कॅलरी खूप जास्त कमी असतात.

बाजरी गरम असते. यामुळे हिवाळ्यात तिचा आहारात समावेश करा. ज्वारीची भाकरी कायमच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.