
गेल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज प्रदर्शित झाले. त्यापैकी एका वेब सीरिजने सर्वांना मागे टाकत टॉपचं स्थान पटकावलं आहे. या सीरिजचं नाव आहे 'मिर्झापूर 3'. प्रेक्षकांकडून या सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ओटीटीच्या यादीत ही वेब सीरिज ट्रेंडिंगला आहे.

अत्यंत साधी-सहज मांडणी असणारी 'पंचायत 3' ही वेब सीरिज या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. 'पंचायत'चे दोन्ही सिझन खूप गाजले होते. यातल्या प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

जितेंद्र कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'कोटा फॅक्ट्री' या वेब सीरिजवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ओटीटी ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत ही वेब सीरिज तिसऱ्या क्रमाकांवर आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'बॅड कॉप' ही सीरिज चौथ्या स्थानी आहे. अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण अशी ही सीरिज असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

जियो सिनेमावरील 'हाऊस ऑफ ड्रॅगन'चाही या यादीत समावेश आहे. ही सीरिज तुम्ही मोफत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

'गुल्लक'चा तिसरा सिझन नवनव्या कहाण्या घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टॉप ट्रेंडिंग यादीत या सीरिजचाही समावेश आहे.