मीस युनिर्व्हसपासून फक्त एक पाऊल दूर, केरळची अप्सरा 115 सौंदर्यवतींना मागे टाकणार का? 3000 हिऱ्यांचा मुकूट जिंकणार?

भारताकडून मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत सहभागी झालेली 19 वर्षीय काजिया लिझ मेजो सध्या चर्चेत आहे. 116 देशांतील स्पर्धक, 3,000 हून अधिक हिऱ्यांनी सजलेला मुकुट आणि भारतासाठी ऐतिहासिक किताब जिंकण्याची संधी... काजिया यंदा विश्वसुंदरी ठरणार का?

| Updated on: Nov 24, 2026 | 8:14 PM
1 / 5
भारताचे प्रतिनिधित्व करणारी 19 वर्षीय काजिया लिझ मेजो : मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत भारताकडून केरळची 19 वर्षीय काजिया लिझ मेजो सहभागी झाली आहे. तिचा जन्म यूएईमध्ये झाला असून तिचे मूळ गाव केरळमध्ये आहे.

भारताचे प्रतिनिधित्व करणारी 19 वर्षीय काजिया लिझ मेजो : मिस युनिव्हर्स 2026 स्पर्धेत भारताकडून केरळची 19 वर्षीय काजिया लिझ मेजो सहभागी झाली आहे. तिचा जन्म यूएईमध्ये झाला असून तिचे मूळ गाव केरळमध्ये आहे.

2 / 5

115 स्पर्धकांशी होणार मुकाबला : यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धेचे 75 वे वर्ष आहे. जगभरातील 116 देश आणि प्रदेशांतील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. काजियासमोर 115 स्पर्धकांचे आव्हान आहे.

3 / 5

मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब : 23 ऑगस्ट 2026 रोजी जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत काजियाने विजेतेपद मिळवले. केरळमधून हा किताब जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे.

4 / 5

अभ्यासासोबत नृत्य आणि संगीताची आवड : काजिया सध्या बंगळुरूमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. मॉडेलिंगसोबतच तिला अभिनय, शास्त्रीय नृत्य आणि संगीताची आवड आहे. ती व्हायोलिन आणि ड्रम्सही वाजवते.

5 / 5

3,000 हिऱ्यांनी सजलेला मुकुट : यंदाच्या मिस युनिव्हर्स विजेतीला 3,000 हून अधिक हिरे जडवलेला खास मुकुट मिळणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी पोर्तो रिकोमधील सॅन हुआन येथे अंतिम फेरी पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता अंतिम सोहळा सुरू होईल. भारताची काजिया हा किताब जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us