Car Price Hike: गाडी घेण्याचं स्वप्न महागलं! टाटानंतर आणखी दोन कंपन्यांचा मोठा निर्णय; कारप्रेमींना धक्का
आजकाल ऑटो क्षेत्रात उत्पादन, निर्मिती आणि परिचालन खर्च वाढत आहेत. यामुळेच ऑटोमोबाइल क्षेत्रात दरवाढीची मालिका दिसून येत आहे. ग्राहकांची मागणी आणि त्यांचा नफा यांचा ताळमेळ साधण्यासाठी कंपन्या किमती वाढवत आहेत. भारतात सर्वाधिक पसंती असलेल्या तीन मोठ्या कार कंपन्यांनीही किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Audi India, TATA Cars Price Hike: तुम्ही जर नवीन वर्षात नवीन गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन वर्षात तुम्हाला चारचाकी कार घेणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण टाटाकंपनीसह, मारुती सुझुकी तसेच ऑडीनेही 1 जानेवारीपासून गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
ऑडीसह टाटा, मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार…!
समोर आलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सच्या पाठोपाठ, जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडी इंडियानेही दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती १ जानेवारी २०२७ पासून २% पर्यंत वाढवत आहे. ऑडीने वाढता उत्पादन खर्च आणि दीर्घकाळ आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याची गरज ही कारणे दिली आहेत.
ऑडी इंडियाने मंगळवारी दरवाढीची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सर्व मॉडेल्सच्या किमती २% पर्यंत वाढतील. नवीन किमती १ जानेवारी २०२७ पासून लागू होतील. बलबीर सिंग ढिल्लन यांच्या मते ग्राहकांना सर्व मॉडेल्समध्ये एक उत्कृष्ट प्रीमियम मालकीचा अनुभव देण्यावर आणि ब्रँडवरील त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यावर कंपनीचा भर आहे. आजकाल ऑटो क्षेत्रात उत्पादन, निर्मिती आणि परिचालन खर्च वाढत आहेत. यामुळेच ऑटोमोबाइल क्षेत्रात दरवाढीची मालिका दिसून येत आहे. ग्राहकांची मागणी आणि त्यांचा नफा यांचा ताळमेळ साधण्यासाठी कंपन्या किमती वाढवत आहेत.
टाटा, मारुतीचाही मोठा निर्णय!
ऑडीच्या आधी, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियानेही किमती वाढवल्या आहेत. निवडक मॉडेल्ससाठी ही दरवाढ २२ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. यामुळे वाहनांच्या व्हॉल्यूम-वेटेज्ड सरासरी किमतीत अंदाजे ०.३१% वाढ झाली आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर सतत वाढणाऱ्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मारुतीने म्हटले होते. तथापि, कंपनीने कामकाज सुव्यवस्थित करून आणि वाढलेल्या खर्चाचा काही भाग स्वतः उचलून ग्राहकांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे मारुतीने २०२६ मध्ये अनेक वेळा किमती वाढवल्या आहेत. सप्टेंबरमध्येही कंपनीने निवडक मॉडेल्सच्या किमती ₹२०,००० पर्यंत वाढवल्या होत्या. दुसरीकडे, टाटा मोटर्सनेही दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनीने १ ऑक्टोबरपासून आपल्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमती १% पर्यंत वाढवल्या होत्या. आता, ऑडीच्या निर्णयावरून हे स्पष्ट होते की वाढत्या खर्चाचा परिणाम विविध विभागांतील वाहन उत्पादकांवर होत आहे.
