Nikita Porwal : भारताची निकिता पोरवाल म्हणजे सौंदर्याची खाण, यंदाची मिसवर्ल्ड होणार? जगभरात तिची का होतेय चर्चा?

भारताची निकिता पोरवाल मिस वर्ल्ड 2026 च्या अंतिम फेरीत देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. ५ सप्टेंबर रोजी व्हिएतनाममध्ये होणाऱ्या या ग्रँड फायनलमध्ये निकिता भारतासाठी मुकुट जिंकण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 04, 2026 | 7:30 PM
1 / 7
भारताची निकिता पोरवाल आता मिस वर्ल्ड 2026च्या अंतिम फेरीत देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेची 75वी आवृत्ती सध्या व्हिएतनाममध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची ग्रँड फायनल 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. निकिता अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्येही मोठा उत्साह आहे. भारताला रिप्रेझेंट करणारी ही निकीत कोण आणि काय करते, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.तिच्याबद्दल जाणून घेण्याची मोठी उत्सुकता आहे.  (Social Media)

2 / 7

मिस वर्ल्डमध्ये भारताला रिप्रेझेंट करणारी निकीता पोरवाल ही मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहे. 2024 साली तिने फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर तिला मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

3 / 7

टीव्ही अँकर म्हणून निकिताने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. एवढंच नव्हे तर तिने थिएटरमध्येही काम केले. निकीता ही अभिनेत्री, मॉडेल आणि नाटककार देखील आहे. मिस वर्ल्डच्या अधिकृत वेबसाइटनुसार, निकिताने 60हून अधिक नाट्यप्रयोगांमध्ये काम केलंय.

4 / 7

ती ‘रंगरेज’ या थिएटर कंपनीची क्रिएटिव्ह डायरेक्टरदेखील आहे. याशिवाय तिला लेखन आणि सामाजिक कार्याचीही आवड आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.

5 / 7

मिस वर्ल्डच्या प्रवासात निकिताने आपल्या कामगिरीतून भारतीय संस्कृती आणि परंपरेची झलकही जगासमोर मांडली. ‘डान्स ऑफ द वर्ल्ड’ या राउंडमध्ये तिने देवी मीनाक्षीपासून प्रेरणा घेतलेला लूक साकारत अप्रतिम सादरीकरण केलं. तिला सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद मिळाला. आता सर्वांच्या नजरा 5 सप्टेंबरला होणाऱ्या ग्रँड फायनलकडे लागल्या आहेत. भारताचे प्रतिनिधित्व करताना निकिता देशासाठी मिस वर्ल्डचा मुकुट जिंकणार का, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

6 / 7

निकितानेही आपल्या संदेशातून भारतीय चाहत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केलं असून, व्हिएतनाममध्ये भारताचा झेंडा उंचावण्याची आशा व्यक्त केली आहे. निकिता भारतासाठी मिस वर्ल्डचा मुकुट जिंकू शकेल का ? याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

7 / 7

मिस वर्ल्ड 2026ची अंतिम फेरी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून JioHotstar वर थेट दाखवली जाणार आहे. भारतातील प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहण्यासाठी इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मची गरज लागणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us