AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बाजारात आला Ai टुथब्रश, कॅमेऱ्याच्या मदतीने घासून देणार दात; भन्नाट फीचर्स वाचून चकित व्हाल!

हा ब्रश साधारण इलेक्ट्रिक ब्रश नाही. तो एआयच्या मदतीने काम करेल. ब्रश करणे, फ्लॅसिंग करणे, माऊथवॉश करणे अशा प्रकारची कामे तो करेल. या ब्रशमध्ये एक लाख पिक्सेलचा मायक्रोलेन्स कॅमेरा बसवण्यात आलेला आहे.

आता बाजारात आला Ai टुथब्रश, कॅमेऱ्याच्या मदतीने घासून देणार दात; भन्नाट फीचर्स वाचून चकित व्हाल!
dyson ai brushImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2026 | 7:27 PM
Share

Dyson Ai Brush : मानवी शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. आपल्या प्रत्येक अवयवांची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण थोडेजरी दुर्लक्ष केले तर त्याचे फळ आपल्याला भोगावे लागू शकते. मुखाच्या म्हणजेच तोंडाच्या आरोग्याकडे बहुसंख्य लोक दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे तोंडात असणाऱ्या दातांची निगा राखण्याची तर लोक खूपच टाळाटाळ करतात. यामुळे भविष्यात दात लवकर पडण्याची, त्रास होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून दररोज दात स्वच्छ घासावेत असे डेन्टिस्ट सांगतात. परंतु काही लोक थातूर-मातूर दात घासून पुढच्या कामाला लागतात. अनेक लोकांना दात घासण्याचा कंटाळा असतो. त्यामुळेच आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रशचा अविष्कार करण्यात आलेला आहे. सध्या मात्र बाजारात थेट एआय ब्रश आला आहे.

डायसन या कंपनीने हा ब्रश तयार केला

हा ब्रश एआयच्या मदतीने तुमचे दाथ घासून देईल. या ब्रशमध्ये 1 लाख पिक्सेल कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने हा ब्रश तुमच्या दातांचे निरीक्षण करेल. कुठे अन्नाचा तुकडा फसलेला आहे, हे शोधून हा ब्रश तो भाग स्वच्छ करून देईल. डायसन या कंपनीने हा ब्रश तयार केला आहे. डायसन ही कंपनी व्हॅक्यूम क्लिनर, हेअर ड्रायर, प्रीमियम हेडफोन तयार करते. आता याच कंपनीने एआय ब्रशची निर्मिती केली असून या ब्रशला डायसन कॅमरा-जेट (Dyson CameraJet) असे नाव देण्यात आलेले आहे.

ब्रशची विशेषता काय आहे?

हा ब्रश साधारण इलेक्ट्रिक ब्रश नाही. तो एआयच्या मदतीने काम करेल. ब्रश करणे, फ्लॅसिंग करणे, माऊथवॉश करणे अशा प्रकारची कामे तो करेल. या ब्रशमध्ये एक लाख पिक्सेलचा मायक्रोलेन्स कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. साधारण 4 लाख 70 हजार वेगवेगळ्या इमेसजच्या माध्यमातून या ब्रशच्या एआय मॉडेलला प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या ब्रशच्या वर 12.5 मीलीलिटरचा एक टँक असेल. यात माऊथवॉश टाकता येईल. मुखामध्ये वरच्या तसेच खालच्या अशा दोन्ही बाजूंनी या ब्रशच्या मदतीने दातांची सफाई करता येईल. दरम्यान, या ब्रशची सगळीकडे चर्चा होत असून त्याची नेमकी किंमत अद्याप समोर आलेली नाही.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल