हॉटेल MH 30 मध्ये सपासप वार नंतर जाळलं! अक्षय नागलकर प्रकरणात हादरवून टाकणारा ट्विस्ट, 8 मित्र आले अन्…

सध्या अकोल्यात हादरवून टाकणारे हत्याकांड समोर आले आहे. येथे एकूण आठ जणांनी आपल्याच मित्राचा निर्घृणपणे खून केला आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे.

| Updated on: Oct 25, 2025 | 9:28 PM
1 / 5
अकोल्यातल्या बहुचर्चित 'अक्षय नागलकर' मिसींग प्रकरणात मोठी अपडेड समोर आली आहे. अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. अक्षयच्या 8 मित्रांनीच त्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाल आहे.

2 / 5
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा खुनाचा उलगडा करीत मुख्य आरोपीसह 4 आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. चार जण अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत असून ते हाती लागल्यानंतर या प्रकरणाचा आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अगोदर अकोल्यातल्या MH 30 हॉटेलवर अक्षयवर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी करण्यात आलं नंतर मोरगाव भाकरे शेतशिवारात मृत समजून त्याला टीनच्या शेडमध्ये जाळण्यात आल्याचं समोर आलं आहे.

4 / 5
काही दिवसांपूर्वी अकोला शहरातल्या डाबकी रोड पोलीस  ठाण्यात अक्षय हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी चंद्रकांत बोरकर, ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, क्रिष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे, अमोल उन्हाळे असे या मारेकरांची नावे आहेत.

5 / 5
यातील चंद्रकात बोरकर, ब्रम्हा भाकरे, कृष्णा भाकरे आणि आशु उर्फ आशिष वानखडे हे चार जण अटकेत आहेत. तर फरार झालेल्या इतर चौघांचा शोध घेतला जात आहे. या हत्या प्रकरणामुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.