सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेताच आंदोलक आक्रमक; अडवली पोलिसांची गाडी

नाशिक-पुणे रेल्वे हा फक्त वाहतुकीचा नाही, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा प्रश्न आहे, असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी जनआंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताच आंदोलक आक्रमक झाले आहेत.

| Updated on: Aug 09, 2026 | 11:31 AM
1 / 5
पुणे-नाशिक डायरेक्ट रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

पुणे-नाशिक डायरेक्ट रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज पुणे-नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या रेल्वे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

2 / 5

या रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी विरोध दर्शविला आहे. यावेळी सत्यजीत तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर संतप्त आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.

3 / 5

पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग खेड मंचर नारायणगाव या भागातून झाला पाहिजे, या मागणीसाठी आज चाकण, मंचर ,नारायणगाव आळेफाटा इथं चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला लोकांच्या मनातील भावना सांगायच्या असतील तर रस्त्यावर उतरावं लागेल, असं सत्यजीत तांबे म्हणाले.

4 / 5

सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीत नेताना बरीच झटापट झाली. आंदोलकांना वाहनासमोर उभं राहून पुढे जाण्यास विरोध केला. तर अनेकांनी सत्यजीत तांबे यांना गाडीत नेता येऊ नये म्हणून एका बाजूने त्यांचा हात धरत त्यांना बाहेर खेचलं.

5 / 5

नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक-पुणे मार्गावरील आंदोलनामुळे वाहतूक कोडींच्या त्रासाला वाहनधारकांना सामोरं जावं लागत आहे. तर नाशिक-पुणे रेल्वेसाठी सिन्नर-संगमनेर चाकणमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं. या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us