
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत असून या भेटीचे फोटो समोर आले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकते.

राज ठाकरे दिल्लीच्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांची आज सकाळी सर्वप्रथम भाजपा नेते विनोद तावडे यांनी भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे अमित शाहंच्या भेटीसाठी रवाना झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. दिल्लीत आज जे घडणार तो अमित ठाकरे यांच्यासाठी सुद्धा एक धडा असणार आहे. त्यामुळे राज ठाकरे या भेटीसाठी सोबत पुत्र अमित ठाकरे यांना घेऊन गेले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेची ताकद सध्या फार दिसत नाहीय. पण महायुतीचे बळ मिळाल्यामुळे त्यांची शक्ती वाढेल तसच महायुतीला देखील राज ठाकरेंच्या रुपात एक फायर ब्रांड नेता, वक्ता मिळेल. त्यामुळे या युतीकडे सगळ्यांचच लक्ष आहे.

MIM पद्धतीचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील, ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेसंदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहना मदत करु इच्छित असतील, तर अशा सर्व नेत्यांची, पक्षांची भूमिका महाराष्ट्रद्रोही म्हणून लिहीली जाईल" असं संजय राऊत या संभाव्य युतीआधी म्हणाले आहेत.