Raj Thackeray : छत्रीला माईक बनवून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या त्या मुली शीवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला

Raj Thackeray : महाराष्ट्रात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही शाळकरी विद्यार्थ्यांनी हा मुद्दा व्हिडिओ बनवून माडंला. या विद्यार्थिनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या. त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.

| Updated on: Aug 17, 2026 | 1:07 PM
1 / 5
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरावस्था मांडली होती. त्यांनी बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरावस्था मांडली होती. त्यांनी बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

2 / 5

या शाळकरी मुली हातातल्या छत्रीलाच माईक बनवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलल्या होत्या. “हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत की गाड्या जाताना पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत" अशा शब्दात या मुलींनी फिल्ड रिपोर्टिंग केलं होतं.

3 / 5

छत्रीला माईक बनवणाऱ्या या मुली महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या होत्या. या मुलींनी आज दादर शिवाजीपार्क शीवतीर्थ येथे येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सध्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

4 / 5

आज राज ठाकरे यांनी खड्डयांच्या प्रश्नावरुन आवाज उठवणाऱ्या या मुलींशी संवाद साधला. त्यांच्या पालकांशी चर्चा केली. त्यांचे मुद्दे, म्हणणं समजून घेतलं. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

5 / 5

हा व्हिडिओ अत्यंत गंमतीशीर पद्धतीने बनवला होता. पण महाराष्ट्राच्या रस्त्यांचं नेमकं सत्य त्यातून मांडलं होतं. या शाळकरी मुलींनी उपरोधिकपणे राज्यातील या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us