
Motorola G64 5G Features : या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7025 प्रोसेसर, 6.5 इंच फुल-एचडी प्लस डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, 50 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Motorola G64 5G Price : फ्लिपकार्टवर मोटोरोला स्मार्टफोनचा 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये मिळतो. 12 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेजचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागतील.

Poco X6 Neo 5G Features : या पोको मोबाईल फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर, 12 जीबी व्हर्च्युअल रॅम, 5000mAh बॅटरी, 33 वॅट फास्ट चार्जिंग, 108 मेगापिक्सल रिअर कॅमरा आणि 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco X6 Neo 5G Price : या पोको स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर 27 टक्के सूट देण्यात आली आहे. त्यानंतर हा मोबाईल 15,999 विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Tecno Pova 6 Pro 5G Features : या टेक्नो मोबाईल फोनमध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा, 108 मेगापिक्सल रिअर कॅमरा, 256 जीबी स्टोरेज, 6000mAh बॅटरी, 8GB व्हर्च्युअल रॅम आणि 6.78 इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

Tecno Pova 6 Pro 5G Price : या टेक्नो फोनच्या 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटला Amazon Great Summer Sale मध्ये 13 टक्के सवलतीसह 19,999 रुपयांत विक्री करता येते.