भारताच्या स्टार खेळाडूची राजकारणात एन्ट्री होणार? केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
UP Election : भारताच्या स्टार खेळाडू राजकारणात एन्ट्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान दिल्लीतून एक मोठी बातमी हाती आली.
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जयंत चौधरी आणि मोहम्मद शमी यांच्या भेटीमागे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीचं कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे. शमी हा अमरोहा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.
आरएलडी अध्यक्ष जंयत चौधरी यांनी या भेटीचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आरएलडीतील सूत्रांच्या माहितीनुसार, मोहम्मद शमीने जयंत चौधरी यांच्याशी अमरोहामधून स्वतः किंवा भावासाठी आगामी निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली आहे. मात्र, याला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.