महिलेच्या गंभीर आरोपांनंतर चर्चेत आलेल्या मोहम्मद शमीच्या भावाची क्रिकेट कारकीर्द कशी आहे?

Mohammed Shami Brother Mohammed Kaif : लखनऊमधील एका महिलेने टीम इंडियाचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचं आश्वासन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा महिलेने केला आहे. दररम्यान, आता त्याचे क्रिकेट करिअर चर्चेत आले आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 8:51 PM
1 / 5
क्रिकेटर मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. लग्नाच्या आश्वासनामुळे महिलेने आपली केबिन क्रूची नोकरी सोडल्याचा दावा केला आहे.

क्रिकेटर मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. लग्नाच्या आश्वासनामुळे महिलेने आपली केबिन क्रूची नोकरी सोडल्याचा दावा केला आहे.

2 / 5

29 वर्षीय मोहम्मद कैफ हा बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी, 9 लिस्ट-ए आणि एक टी-20 सामना खेळला आहे.

3 / 5

महिलेच्या आरोपानुसार, कैफने तिला लखनऊ, दिल्ली आणि कोलकाता येथे बोलावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. जेव्हा तिने लग्नाबाबत विचारणा सुरू केली, तेव्हा त्याने तिचा फोन उचलणे बंद केले.

4 / 5

कैफने संपर्क तोडल्यानंतर महिलेने त्याचा मोठा भाऊ मोहम्मद हसीब याच्याशी संवाद साधला. सुरुवातीला मदतीचे आश्वासन देणाऱ्या हसीबने नंतर आपल्याला धमकावण्यास सुरुवात केली, असा आरोप महिलेने केला आहे.

5 / 5

2020 मध्ये इन्स्टाग्रामवरून ओळख झालेली ही महिला घटस्फोटित असून तिला एक मुलगा आहे. तिने लखनऊमधील आशियाना आणि विभूती खंड पोलिस ठाण्यात तसेच डीसीपी कार्यालयात कैफविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us