
ज्योतिषशास्त्रात शरीरावर असलेल्या तिळांना फार महत्त्व आहे. शरीरावर असलेल्या तिळाच्या स्थानावरून व्यक्तीचा स्वभाव, भाग्य, आयुष्यातील चढउतार याबाबत काही संकेत मिळतात.

काही विशेष ठिकाणी तीळ असेल तर ऐश्वर्य, समृद्धी आणि सुकी जीवनाचे ते लक्षण मानले जाते. शरीराच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर मान सन्मान आणि वैभव मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. महिलेच्या शरीराच्या उजव्या भागावर तीळ असेल तर तशा महिलांना समाजात तसेच कुटुंबात मानाचे स्थान मिळते.

समुद्रशास्त्रानुसार महिलेच्या नाकावर तीळ असेल तर त्या महिलेला भौतिक सुख-सुविधा मिळतात. तसेच अशा प्रकारच्या तरुणींना धनी नवरा मिळण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रानुसार महिलेच्या ओठांवर तीळ असेल तर धन, संपत्ती, स्वादिष्ट भोजन मिळण्याचे संकेत मिळतात. अशा प्रकारच्या महिलांना समाजात चांगले स्थान मिळते.

एखाद्या महिलेच्या खांद्यावर तीळ असणे हे शुभसंकेत मानले जातात. खांद्यावर तीळ असणारी महिला भाग्यवान असते. तिला कुटुंबात खूप सन्मान मिळू शकतो, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.