
अनेकजण मांसाहारी असतात. काही लोकांना तर चिकन खायला फारच आवडतं. चिकनचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खाणारे तुमच्या आजूबाजूला असतीलच. तर दुसरीकडे काही लोक मांसाहार सोडून शाकाहारी जेवण करण्यास प्राधान्य देतात. चिकनच्या माध्यमातून शरीराला जास्तीत जास्त प्रोटीन मिळावेत, हाच चिकन खाण्यामागचा उद्देश असतो.

मूग डाळ खाल्ल्यानेही तुमच्या शरीराराल बरेच प्रोटीन मिळतात. शरीराला प्रोटीन फारच गरजेचे असतात. कारण शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळाले तर स्नायूंना बळकटी येते. प्रोटीनमुळे शरीराला मजबुती मिळते. पण काही शाहाकारी पदार्थांमधूनही तुम्हाला प्रोटीन मिळते.

बहुसंख्य शाकाहारी लोक प्रोटीम मिळावे यासाठी मूग हे कडधान्य खातात. अनेक लोक प्रोटीनसाठी आवडीने मूग स्प्राऊट घेतात. त्यामुळेच 100 ग्रॅम चिकनमध्ये जास्त प्रोटीन असते की 100 ग्रॅम मुगात जास्त प्रोटीन असते हे जाणून घेणे गरजेचे आहे. एका अभ्यासानुसार 100 ग्रॅम मुगात साधारण 7.02 ग्रॅम प्रोटीन असते.

यासह 100 ग्रॅम मुगात साधारण 7.6 ग्रॅम फायबर्स असतात. यामळे तुम्हाला अनेक जीवनसत्त्वे मिळतात. तर 100 ग्रॅम चिकनमध्ये साधारण 31 ग्रॅम प्रोटीन असते. मूग डाळीत प्रोटीनचे प्रमाण कमी असते पण यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. तर दुसरीकडे चीकनमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तुम्हाला जास्त प्रोटीनचा आहार घ्यायचा असेल तुम्ही चिकन खाऊ शकता.

चिकनव्यतिरिक्त तुम्हाला मूग डाळ,सोयाबीन यासारख्या शाकाहारी पदार्थांमधूनही प्रोटीन मिळतात. (टीप- ही स्टोरी उपलब्ध सोअर्सवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)