त्वचेची काळजी घेताना बहुतांश महिला करतात ‘ही’ चूक !

| Updated on: Nov 01, 2022 | 10:40 AM

1 / 5
आपल्या त्वचेची काळजी घेणं ही एक चांगली सवय आहे. मात्र स्किन केअर रुटीनमध्ये बहुतांश महिला काही अशा चुका करतात, ज्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते व चेहऱ्यावरील चमक हळूहळू कमी होत जाते. आज आपण त्वचेशी संबंधित काही अशा त्रुटींबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते.

2 / 5
महिला असोत वा पुरुष, ज्याची त्वचा ऑईली म्हणजेच तेलकट असते, ते एक चूक पुन्हा-पुन्हा करतात. तेलकट त्वचेवर मॉयश्चरायझर लावल्याने सीबमचे उत्पादन आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीत त्वचेवर पिंपल्स किंवा ॲक्ने होऊ शकतात.

3 / 5
त्वचेची छिद्र साफ करायची असतील तर एक्सफोलिएशन हा एक मार्ग आहे. बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेती, जी वापरुन स्क्रबिंग आणि स्वच्छता सहज करता येते. मात्र काही वेळेस त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्त्रिया अधिक एक्सफोलिएट करतात, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते किंवा त्यावर पुरळ निर्माण होऊ शकते.

4 / 5
सकाळी उठल्यानंतर फेस वॉशने त्वचा स्वच्छ करणे आणि नंतर मॉयश्चरायझर लावणे हे डे केअर रूटीन सर्वजण फॉलो करतात. पण बरेचजण रात्री त्वचेकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. त्वचेला रात्री आराम मिळतो, त्यामुळे या काळातही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

5 / 5
चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमं येणे हे सामान्य आहे. हार्मोन्समध्ये बदल होणे किंवा नीट देखभाल न करणे हे यामागचे कारण असू शकते. केवळ महिलाच नाही, तर पुरुषही पिंपल्स फोडण्याची चूक करतात. पिंपल्स कधीही फोडू नयेत, तसे केल्यास त्वचेवर खुणा अथवा डाग दिसू लागतात.