
आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर मारले आहेत. मात्र आता तो निवृत्त झाला आहे. आफ्रिदीने अनेकवेळा शेवटी खेळायला सामने पालटवले असून संघाला विजय मिळवून दिला आहे.

आशिया कपचे गतविजेता श्रालंका संघाचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याने 23 सिक्स मारले आहेत. जयसूर्या दुसऱ्या स्थानी असून तोसुद्धा आता निवृत्त झाला आहे. जयसूर्य श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू होता.

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. रैनाने 18 सिक्स मारले आहेत. रैनाही आता निवृत्ता झालाय. रैनाने पाकिस्तानविरूद्ध आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्ध दमदार खेळी केली.

आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहेल. रोहितने 17 सिक्स मारले असून त्याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे. रोहितकडे हा विक्रम आपल्या नावाव करायला आणखीन सहा सिक्स मारावे लागतील.. हिटमॅनसाच हे काही मोठं आव्हान नसणार. एकदा रंगता आला तर तो एकाच मॅचमध्ये हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

पाचव्या स्थानी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुल ही पाचव्या स्थानी आहे. त्याने आशिया कपमध्ये १३ सिक्स मारले असून टीम इंडियामध्ये 'दादा' अशी गांगुलीची ओळख आहे. दादने क्रिकेटचा चेहरमोहरा बदलला आणि संघालाा परदेचशात जावून जिंकू दिलं.