‘नागिन’ची कोट्यवधींची कमाई कशी होते? 40% सोशल मीडिया, 20% चित्रपट अन्..

टीव्ही मालिकांमधून चित्रपटांपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कमाईविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आपली सर्वाधिक कमाई कुठून होते, याविषयी तिने सांगितलं आहे.

| Updated on: Oct 31, 2024 | 1:46 PM
1 / 5
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आता चित्रपटांमध्ये सक्रिय झाली आहे. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर 'नागिन' या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय आता चित्रपटांमध्ये सक्रिय झाली आहे. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर 'नागिन' या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

2 / 5

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौनीने तिच्या कमाईविषयी खुलासा केला. मौनी चित्रपटांमध्ये जरी काम करत असली तरी त्यातून फारशी कमाई होत नसल्याचं तिने सांगितलं आहे.

3 / 5

"चित्रपटांपेक्षा जास्त कमाई माझी जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे होते. मी बऱ्याच रेस्टॉरंटमध्येही गुंतवणूक केली आहे. खरं सांगायचं झालं तर माझी 40 टक्के कमाई ही सोशल मीडियातून होते. तर 20 टक्के कमाई चित्रपटांमधून आणि 40 टक्के कमाई जाहिरातींमधून होते", असं मौनी म्हणाली.

4 / 5

"माझ्या कमाईपैकी 50 टक्के मी गुंतवणूक करते आणि त्याद्वारे मी माझ्या भविष्याबद्दल निश्चिंत असते. उर्वरित 50 टक्क्यांमधून मी माझा बाकीचा खर्च करते", असं मौनीने सांगितलं.

5 / 5

मौनी नुकतीच डिस्ने प्लस हॉटस्टारवरील 'शो टाइम' या सीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये तिने अभिनेता इमरान हाश्मीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us