
आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी सुद्धा खास ओळखली जाते.

मौनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

लाल रंगाच्या या वन पिसमध्ये ती हॉट दिसत आहे. नेहमीच फॅशन आयकॉन ठरत असलेल्या मौनीचा हा अंदाज देखिल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.