
'रुही' या चित्रपटानंतर अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. करण जोहर निर्मित 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाल्याने बॉक्स ऑफिवर कमाई दमदार होणार असल्याची शक्यता आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात जान्हवी कपूरने महिमा ही भूमिका साकारली आहे. ती क्रिकेटची खूप मोठी चाहती असते. रिपोर्ट्सनुसार जान्हवीला या भूमिकेसाठी पाच कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

अभिनेता राजकुमार रावला जान्हवीपेक्षा एक कोटी रुपये अधिक मानधन मिळालं आहे. त्याने 6 कोटी रुपये फी स्वीकारली आहे. शरन शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात राजेश शर्मा यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांना या प्रोजेक्टसाठी 40 लाख रुपये मानधन मिळालं आहे. राजेश शर्मा यांनी याआधीही अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात अभिनेते कुमुद मिश्रा यांनी राजकुमार रावच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना 30 लाख रुपये मानधन मिळालं आहे. कुमुद हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहेत.

अभिषेक बॅनर्जी यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या भूमिकेसाठी त्यांनी 35 लाख रुपये मानधन स्वीकारलं आहे.

अभिनेत्री जरीना वहाब यांनी 'मिस्टर अँड मिसेस' या चित्रपटात राजकुमार रावच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना 30 लाख रुपये मानधन मिळालं आहे.