
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली. 8 जानेवारी रोजी सलग चौथ्या दिवशी मोठी पडझड झाली. भारतावर 500 टक्के कर लावण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेत एक विधेयक पुढील आठवड्यात मतदानासाठी येत आहे. पण या दबावातही मुकेश अंबानी यांच्या कंपनीने मोठी कामगिरी बजावली आहे.

बाजारात गेल्या चार दिवसांपासून उलथापालथ सुरू असताना मुकेश अंबानी यांनी खरेदी केलेल्या या टेक्सटाईल कंपनीने दणक्यात सुरुवात केली आहे. आलोक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरने बाजारात दमदार कामगिरी करून दाखवली. या शेअरने मोठी उसळी घेतली.

आलोक इंडस्ट्रीजच्या शेअरने आज बाजारात जवळपास 8.5 टक्क्यांनी उसळला. हा पेनी शेअर आज 17.21 रुपयांपर्यंत पोहचला. गेल्या दोन आठवड्यातील ही उच्चांकी झेप आहे. गेल्या तीन सत्रात या शेअरमध्ये पडझड सुरू होती. पण आज या शेअरने कमाल केली.

गेल्या महिन्यात हा शेअर दबावाखाली आहे. जुलै ते डिसेंबर 2025 रोजी दरम्यान आलोक इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास 22 टक्क्यांनी आपटला होता. तर गेल्या सात महिन्यांत हा शेअर लाल रंगात न्हाऊन निघाला. संपूर्ण कॅलेंडर वर्षात, 2025 हा शेअर जवळपास 24 टक्क्यांनी झोपला होता. 2022 नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जाते.

आलोक इंडस्ट्रीजची स्थापना 1986 मध्ये झाली होती. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. कंपनी कॉटन आणि पॉलिस्टर या दोन्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. 2020 मध्ये कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनेन्शिअलने या कंपनीची खरेदी केली. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा 40 टक्के इतका आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.