
Mercedes Benz S-Class : इशा अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेन्ज एस क्लास कार आहे. ही कार तुम्हाला पॉपुलर सेलेब्रिटीज, बिजनेस मॅनच्या गॅरेजमध्ये पहायला मिळते. ही एक फ्लॅगशिप सेडान कार आहे. याची सध्याची एक्स शो रुम किंमत 1.77 कोटीपासून 1.86 कोटी रुपये आहे.

Porsche Cayman S : पोर्शे केमॅनची एक्स-शोरूम किंमत 1.48 कोटी रुपये आहे. केमॅनमध्ये 3436cc पावरफुल इंजिन मिळतं.

BMW 7-series : बीएमडब्लू कार लग्जरी कार्समध्ये सर्वाधिक पसंत केली जाते. बीएमडब्ल्यू 7-सीरीजची एक्स शोरूम किंमत 1.82 ते 1.84 कोटी रुपया दरम्यान आहे.

Rolls Royce Cullinan : इशा अंबानीच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस कलिनन सुद्धा आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. ही कार 6.5 लीटर V12 पेट्रोल इंजिनवर चालते.

Bentley Arnage R : इशा अंबानीच्या गॅरेजमध्ये बेंटले अर्नेज आर सुद्धा आहे. ही कार आता मार्केटमध्ये बंद झाली आहे. पण इशाच्या गॅरेजमध्ये तुम्हाला ही कार दिसेल. या कारची शेवटची लिस्टेड किंमत 2.25 कोटी रुपये आहे.