या तीन मुलांकाचे लोक प्रेमवेडे, थेट आर-पारच्या लढाईला तयार, जोडीदारासाठी…

काही जण छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रेम दाखवतात, तर काही कठीण प्रसंगी जोडीदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मात्र, मूलांक 2, 3 आणि 6 असलेल्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत थेट आर-पारची लढाई करायला तयार असतात.

| Updated on: Nov 23, 2026 | 10:06 PM
1 / 5
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही जण छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रेम दाखवतात, तर काही कठीण प्रसंगी जोडीदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मात्र, मूलांक 2, 3 आणि 6 असलेल्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत थेट आर-पारची लढाई करायला तयार असतात.

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही जण छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रेम दाखवतात, तर काही कठीण प्रसंगी जोडीदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मात्र, मूलांक 2, 3 आणि 6 असलेल्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत थेट आर-पारची लढाई करायला तयार असतात.

2 / 5

महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या मूलांकाचा स्वामी चंद्र असल्याने अशा व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या मानल्या जातात. जोडीदाराच्या मनातील भावना ओळखून त्याच्या छोट्या-छोट्या गरजांची काळजी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

3 / 5

महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या अंकाचा संबंध देवगुरू बृहस्पतीशी जोडला जातो. अशा व्यक्ती प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि परस्पर आदराला प्राधान्य देतात. जोडीदाराच्या मतांचा आदर करण्यासोबतच त्याच्या प्रगतीसाठीही प्रोत्साहन देतात.

4 / 5

6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. या अंकाचा स्वामी शुक्र असून त्याचा संबंध प्रेम, आकर्षण आणि ऐषारामाशी जोडला जातो. त्यामुळे मूलांक 6 असलेल्या व्यक्ती रोमँटिक स्वभावाच्या मानल्या जातात. जोडीदाराला सरप्राइज देणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे आणि आनंदी ठेवणे त्यांना आवडते.

5 / 5

अंकशास्त्रानुसार, या तिन्ही मूलांकांच्या व्यक्ती प्रेमसंबंधांना गांभीर्याने घेतात. नात्यातील भावनिक जवळीक, विश्वास आणि एकमेकांची साथ यांना त्या महत्त्व देतात. एकदा प्रेमात पडल्यानंतर जोडीदाराची साथ न सोडता नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतात, अशी मान्यता आहे. (टीप- आम्ही कोणताही दावा करत नाही. तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us