AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुंबाडची मंजुळा’ हिट होताच ओम भुतकरने उरकलं लग्न; कोण आहे पत्नी?

मुळशी पॅटर्न आणि तुंबाडची मंजुळा फेम अभिनेता ओम भुतकरने नुकतंच लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

| Updated on: Jul 10, 2026 | 1:11 PM
Share
'मुळशी पॅटर्न', 'रावरंभा', 'न्यूड', 'तुंबाडची मंजुळा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ओमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

1 / 5
ओमच्या पत्नीचं नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार ती वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट असल्याचं कळतंय. ओमचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने त्याच्या खाजगी आयुष्याचे अपडेट्स फॉलोअर्सशिवाय इतरांना कळत नव्हते.

2 / 5
'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या यशानंतर ओमने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. त्याच्या लग्नाला अभय महाजन, अलोक राजवाडे, पर्ण पेठे असे कलाकार उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांनी ओमच्या लग्नाचे फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
ओम भुतकरने 2004 मध्ये 'छोटा सिपाही' या हिंदी चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ओम 'मघलूब' या टोपणनावाने उर्दूमध्ये तसंच मराठीत कविता लिहितो. 'सुखन' नावाच्या नाट्यप्रयोगांसाठीही तो ओळखला जातो.

4 / 5
प्रवीण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली आहे. तसंच 'न्यूड', 'देऊळ', 'फास्टर फेणे', 'लेथ जोशी' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला