Multibagger Stock: टाटा कंपनीचा हा शेअर सुसाट, 1 लाखांचे झाले 4.5 कोटी, गुंतवणूकदारांना मोठी लॉटरी

Multibagger Stock: टाटा कंपनीच्या या शेअरने गुंतवणूकदारांना मोठी लॉटरी लावली आहे. टाटा कंपनीचा शेअर सुसाट सुटला आहे. या शेअरने 1 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 4.5 कोटींचा परतावा दिला आहे. कोणता आहे हा स्टॉक?

| Updated on: Mar 26, 2026 | 5:11 PM
1 / 6
टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. टायटनच्या शेअर्सनी गेल्या 15 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले. या 15 वर्षांत टायटनच्या शेअरमध्ये ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले. त्यांना 4 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.

2 / 6
शेअर बाजारात ज्यांना बिग बूल म्हटले जाते त्या राकेश झुनझुनावाला यांनाही याच शेअरने मोठा परतावा मिळून दिला होता. त्या या शेअरमध्ये मोठा डाव टाकला होता आणि त्यांना मोठा फायदा झाला होता. आता हा शेअर पुन्हा चर्चेत आला आहे. या शेअरने मोठा परतावा मिळून दिला आहे.

3 / 6
टायटनचा शेअर 25 मार्च 2011 रोजी 175.45 रुपयांवर होता. जर एखाद्या व्यक्तीने त्यावेळी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्या गुंतवणूकदाराला 568 शेअर मिळाले असते. या कंपनीने गुंतवणूकदारांना एकदा बोनस शेअरचे गिफ्ट दिले आहे. शेअर 10 तुकड्यांमध्ये विभागला गेला होता.

4 / 6
ज्यांनी 2011 मध्ये 568 शेअर खरेदी केले, ते बोनस शेअर, शेअर स्प्लिटमुळे ही संख्या 11,360 शेअरवर पोहचली. 25 मार्च 2026 रोजी बीएसईवर हा शेअर 4038.40 रुपयांवर बंद झाला. त्या हिशोबाने 11,360 शेअर्सचे मूल्य 4.58 कोटी रुपयांवर पोहचले. यादरम्यान कंपनीने लाभांशचे पण गिफ्ट दिले आहे.

5 / 6
गेल्या पाच वर्षांत टायटनचा शे्अर 168 टक्क्यांनी वधारला. टायटन शेअर 26 मार्च 2021 रोजी 1506.1 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 25 मार्च 2026 रोजी  4038.40 रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन वर्षात टायटन शेअर्स 62 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्क्यांनी उसळला.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us