
Diamond Power Infrastructure: पॉवर केबल आणि कंडक्टर पुरवठा करणारी कंपनी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरवर सोमवार, 29 डिसेंबर 2025 रोजी सर्वांचे लक्ष असेल. कंपनीला पॉवर केबल पुरवठ्यासाठी 66 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता बळावली आहे.

स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, डायमंड पॉवर इंफ्राने सांगितले की EPC कॉन्ट्रॅक्टर हिल्ड प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पॉवर केबल पुरवठ्यासाठी कंपनीला 66.18 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. पण ही नवीन वार्ता गुंतवणूकदारांपर्यंत पोहचल्याने सोमवारी शेअर बाजारात अनेकांच्या नजरा या शेअरवर असतील.

या डिसेंबर महिन्यात कंपनीला ही पाचवी मोठी ऑर्डर मिळाली आहे. यापूर्वी कंपनीला डिसेंबर 2025 मध्ये चार मोठ्या ऑर्डर मिळाल्या होत्या. फायलिंग डेटानुसार, कंपनीला 17 डिसेंबर 2025 रोजी बोंडाडा इंजिनिअरिंगकडून 55.54 कोटी रुपये, 16 डिसेंबर 2025 रोजी राजेश पॉवर सर्हिसेजकडून 57.58 कोटी रुपये आणि 11 डिसेंबर 2025 रोजी अमारा राजा इंफ्रा कंपनीकडून 75.13 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

डिसेबर 2025 मध्ये डायमंड पॉवर कंपनीला सर्वात मोठी ऑर्डर 747.64 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीकडून खावडा आणि राजस्थान प्रोजेक्टसाठी पॉवर केबल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात या कंपनीला मोठे काम मिळाले आहे. त्यामुळे या शेअरवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

BSE डेटानुसार, शुक्रवारी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्ये थोडी घसरण झाली. हा शेअर 141 रुपयांहून घसरून 139.95 रुपयांवर बंद झाला. 2023 मध्ये कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसली. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 5100 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला. कंपनीच्या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची घसरण आली आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.