Multibagger Stock: 3600 टक्क्यांचा परतावा, आज शेअर्समध्ये तुफान, किंमत आजही 20 रुपयांपेक्षा कमी

Multibagger Stock Return: मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक एबी इंफ्राबिल्डच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली. हा शेअर अजूनही 20 रुपयांच्या आत आहे. आज या शेअरमध्ये पुन्हा तुफान आले. या शेअरने 3600 टक्क्यांचा परतावा दिला. त्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 4:41 PM
1 / 6
मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक A B Infrabuild च्या शेअरच्या किंमतीत आज पुन्हा 4.5 टक्क्यांची तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरचा भाव दोन आठवड्यात 19.7 रुपयांवर पोहचला. कंपनीला विविध ठिकाणावरून ऑर्डर मिळत असल्याने या शेअरचा भाव वधारला आहे. हा शेअर अजून किती धावणार याच्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

2 / 6
मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, कंपनीला इस्ट कोस्ट रेल्वेकडून 51.43 कोटींचे काम मिळाले. एका पुलावर रस्ता तयार करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे. एकाच महिन्यात कंपनीला हे दुसरे मोठे काम मिळाले आहेत. डिसेंबर महिन्यात कंपनीला 52 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.

3 / 6
तर त्यापूर्वी कंपनीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर रस्ता तयार करण्याचे काम मिळाले होते. एनएच-30 संबंधीचे हे काम होते. एमपी रस्ता विकास महामंडळाने हे काम दिले आहे. या कामाचा कार्याध्येश 10.75 कोटी रुपयांचा आहे. सोमवारी कंपनीने या कामाचीही माहिती एक्सचेंजला दिली होती. त्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढला आहे.

4 / 6
2019 मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली आहे. एबी इन्फ्राबिल्डच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. गेल्या आठ महिन्यात कंपनीच्या शेअर किंमतीत 116 टक्क्यांची तेजी दिसून आली. या दरम्यान कंपनीचा शेअर सप्टेंबरमध्ये 22.50 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला.

5 / 6
या मल्टिबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 2023 मध्ये कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 339 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर 2025 मध्ये गुंतवणूकदारांना 102 टक्क्यांचा फायदा झाला. 2019 पासून ते आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 3600 टक्क्यांची तेजी आली आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.