
या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला. शुक्रवारी हा स्टॉक त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर 1,105 रुपयांवर पोहचला. कधी हा शेअर 5 रुपयांवर ट्रेड करत होता. पण बाजारातील मागणी आणि इतर घाडामोडींमुळे या स्टॉकमध्ये मोठी उसळी दिसली. एका वर्षात या शेअरने जबरदस्त रिटर्न दिला आहे.

CCL Products India Ltd चा शेअर शुक्रवारी तेजीत होता. हा शेअर 1,105 रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहचला. हा शेअर काल 1,034.30 रुपयांवर बंद झाला होता. आज बाजार उघडताच हा शेअर 1,049.30 रुपयांवर पोहचला. त्यानंतर स्टॉकने विक्रम केला .

आज तेजीत असलेला हा शेअर वर्ष 2005 मध्ये केवळ 5.20 रुपयांच्या घरात होता. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 14,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकले असता प्रमोटर्सची हिस्सेदारी 46.11 टक्के आहे. तर या शेअरवर स्थानिक आणि परदेशी गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर 2025 हा वाटा 10.53 टक्के होता. तर डिसेंबर 2025 पर्यंत त्यात 11.01 टक्क्यांची वाढ झाली.

CCL Products एक कॉफी-फोकस्ड कंपनी आहे. इन्स्टंट कॉफी आणि त्यासंबंधीची उत्पादनं ही कंपनी निर्यात करते. इन्स्टंट कॉफी,स्प्रे-ड्राईड, फ्रीज-ड्राईड, फिल्टर कॉफी, फ्लेव्हर्ड कॉफी अशी अनेक उत्पादनं ही कंपनी तयार करते.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.