
Kesar India Limited Stock: आखाती युद्धामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे. पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. केसर इंडिया लिमिटेडच्या शेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी BSE वर या शेअरने कमाल दाखवली.

केसर इंडिया लिमिटेडच्या शेअरने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये 8 टक्क्यांपेक्षा अधिकची झेप घेतली. हा शेअर काल 1166 रुपयांवर झेपावला. गेल्या 3 वर्षांत या स्टॉकने 6600 टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. काल अचानक हा शेअर प्रकाशझोतात आला. गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने गेल्या 6 महिन्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेतली. तर एका वर्षाचा विचार करता हा स्टॉक 93 टक्क्यांनी वधारला. सध्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यू 3200 कोटींहून अधिक आहे. कंपनीच्या घोडदौडीमुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढला.

शेअरने गेल्या 3 वर्षात या शेअरने 6600 टक्क्यांपेक्षा अधिकची भरारी घेतली. मार्च 2023 मध्ये हा शे्अर 17.23 रुपयांवर होता. आता हा शेअर 1,166 रुपयांपर्यंत पोहचला. गेल्या दोन वर्षांत हा शेअर 133 टक्क्यांनी वधारला. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.

केसर इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने 15.34 कोटींचा नफा मिळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात 600 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. या कंपनीने 6 Bonus Share दिले आहेत. मार्च 2024 मध्ये कंपनीने 6:1 प्रमाणात कंपनीने बोनस शेअर दिला.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.