Multibagger Stock: सुपर डुपर फायदा! 1 लाखाचे झाले 98 लाख, या स्टॉकचा दिग्गजांना धक्का

Websol Energy System Stock: या शेअरने बाजारात तुफान आणले आहे. या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. एक लाख रुपयांचे 98 लाख इतका परतावा मिळाला आहे. या स्टॉकचा दिग्गज कंपन्यांना धक्का दिला आहे.

| Updated on: Apr 28, 2026 | 4:52 PM
1 / 6
Websol Energy System Stock या शेअरने कमाल केली आहे. बाजारात काही स्मॉल कॅप कंपन्यांनी तुफान आणले आहे. त्यात ही एक कंपनी आहे. या स्टॉकने मोठी उडी घेतली आहे. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखमीची मानले जाते. पण या स्टॉकने अवघ्या सहा वर्षात मोठी झेप घेतली आहे.

2 / 6
एप्रिल 2020 मध्ये हा शेअर अवघ्या 1.25 रुपयांवर ट्रेड करत होता. पण त्याची किंमत झपाट्याने वाढली. हा शेअर जवळपास 122 रुपयांपर्यंत पोहचला. म्हणजे सहाच वर्षात या शेअरने तुफान परतावा दिला. हा मल्टिबॅगर स्टॉक ठरला.

3 / 6
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 98 लाख रुपये झाले असते. तर तीन वर्षांपूर्वी ज्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना आज जवळपास 14 लाखांचा फायदा झाला असता.

4 / 6
एका वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना फायदा झाला नाही. त्यांना नुकसान सहन करावे लागले. शॉर्ट टर्ममध्ये या शेअरने जोरदार कामगिरी बजावली आहे. एका आठवड्यात जवळपास 38 टक्के आणि एका महिन्यात जवळपास 72 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

5 / 6
मंगळवारी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. या शेअरला अपर सर्किट लागले. हा शेअर 122.20 रुपयांवर पोहचला. म्हणजे बाजारात या शेअरवर गुंतवणूकदार फिदा असल्याचे स्पष्ट झाले. चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा 157 टक्क्यांनी वाढून 125 कोटी रुपयांवर पोहचला. तर महसूल 132 टक्क्यांच्या तेजीसह 401 कोटी रुपयांवर पोहचले.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us