PHOTO: ‘मावळ्या’ची कमाल; कोस्टल रोडसाठी खोदले महाकाय बोगदे

| Updated on: Mar 02, 2021 | 2:43 PM

जमिनीखाली 10 मीटर ते 70 मीटर खोलीवर बांधण्यात येत आहेत महाबोगदे | Mumbai Costal road

1 / 5
कोस्टल रोड प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत असून आता बोगद्याचे १०० मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. यानुसार सदर 100 मीटरच्या खोदकामा दरम्यान मावळा संयंत्राच्याच मदतीने तब्बल 47 कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत.

2 / 5
सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. सदर दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली 10 मीटर ते 70 मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

3 / 5
हे बोगदे खणण्यासाठी 12.9 मीटर व्यास असणारे भव्य असे 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येणार असून या संयंत्राचे 'मावळा' असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र 4 मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल 80 मीटर एवढी आहे.

4 / 5
'मावळा' या संयंत्राची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे 2.6 वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत (2.6 RPM).  'मावळा' या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे. तर 'मावळा' या संयंत्राची उर्जा क्षमता ही 7280किलोवॅट एवढी असून प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज़ सरासरी 8 मीटर बोगदा खणला ज़ाईल, अशी अपेक्षा आहे.

5 / 5
दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.07 किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर असणार आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर (Concrete Lining) असणार असून ज्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर 11 छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत.