
मुंबई-गोवा हायवेवरील अपघातांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मंगळवारी रात्री एका कंटेरनचा मुंबई गोवा हायवेवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण इथं कंटेनरचा भीषण अपघात झाला.

खारेपाटण इथं झालेल्या कंटेनरच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चालकासह वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे.

खारेपाटणच्या सुख नदी पुलावरुन मंगळवारी रात्री हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं अपघातातील मृत चालक आणि वाहकाचे मृतदेह बाहेर काढले. तब्बल 80 फूट खोल हा कंटेनर खाली कोसळून चालक आणि वाहकाला जबर मार बसला होता. त्यात त्यांचा जागीत जीव गेला.

दरम्यान, सकाळपर्यंत हा कंटेनर नदीतच पडून होता. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करताना अनेक अडचणींनाही पोलिसांना तोंड द्यावं लागलं.