
Mumbai Local

मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - ठाण्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकल मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकात थांबतील.

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉग असेल. वाशी -नेरुळ - पनवेल ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असतील.

हार्बर मार्गावर माहीम ते अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. सीएसएमटी - वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी - गोरेगाव अप आणि डाऊन सर्व लोकल रद्द असतील.