AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: विजय साळगावकरचं खऱ्या आयुष्यातील घर; होम थिएटरपासून जिमपर्यंत अनेक सुविधा

Ajay Devgn Home: अजय देवगणच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचं हे घरही चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय ठरतं. ‘दृश्यम 3’मुळे अभिनेता पुन्हा चर्चेत असताना त्याच्या खासगी आयुष्याची झलक देणारं ‘शिवशक्ती’ही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Oct 02, 2026 | 10:45 AM
Share
अजय देवगण सध्या ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’मुळे चर्चेत आहे. आज (2 ऑक्टोबर) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अजय पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र, सिनेमाच्या चर्चेसोबतच अजय देवगण आणि काजोल यांचं मुंबईतील आलिशान घर ‘शिवशक्ती’ही चर्चेचा विषय ठरत आहे.

1 / 9
जुहू परिसरातील या बंगल्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचं कळतंय. मुंबईतील जुहू हा बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या निवासस्थानांसाठी ओळखला जातो. याच परिसरात अजय देवगण आणि काजोल यांचा ‘शिवशक्ती’ बंगला आहे.

2 / 9
या घराच्या बाह्य भागात पांढऱ्या आणि बेज रंगांचा वापर करण्यात आला असून आजूबाजूला हिरवाईही पाहायला मिळते. प्रशस्त प्रवेशद्वार आणि ड्राइव्हवे या घराला भव्य रूप देतात. घराच्या बाल्कनीतून मुंबईच्या परिसराचा सुंदर नजारा दिसतो.

3 / 9
अजय देवगणच्या घराचं नाव ‘शिवशक्ती’ आहे. विशेष म्हणजे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचं नावही शिवशक्ती आहे. त्यामुळे हे नाव केवळ घरापुरतं मर्यादित नसून अभिनेत्याच्या व्यावसायिक आयुष्याशीही जोडलेलं आहे. घराच्या इंटेरिअरमध्ये आधुनिक डिझाइनसोबत कौटुंबिक आठवणींनाही महत्त्व देण्यात आलं आहे.

4 / 9
कुटुंबीयांचे फोटो, पुरस्कार आणि बॉलिवूडशी संबंधित आठवणी घराच्या सजावटीचा भाग आहेत. ‘शिवशक्ती’मधील सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे घरातील लाकडी जिना.

5 / 9
या जिन्यावरून खाली लटकणाऱ्या थेंबांसारख्या दिव्यांची आकर्षक रचना करण्यात आली आहे. काजोलच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही हा जिना अनेकदा पाहायला मिळाला आहे. याशिवाय घरात आणखी एका जिन्यावर फ्रॉस्टेड ग्लासचा वापर करण्यात आला असून पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुंदर मेळ साधण्यात आला आहे.

6 / 9
अजय देवगणच्या या बंगल्यात केवळ आकर्षक सजावटच नाही, तर आराम आणि फिटनेसचीही विशेष काळजी घेतल्याचं दिसतं. घरात इनडोअर जिम असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच घरात होम थिएटरची सुविधाही आहे.

7 / 9
घराच्या लॉबीमध्ये पांढऱ्या संगमरवरी फरशी आणि मोठ्या लाकडी चौकटीच्या काचेच्या खिडक्या आहेत. नैसर्गिक प्रकाशामुळे हा भाग अधिक प्रशस्त आणि आल्हाददायक वाटतो. त्यानंतर पांढऱ्या रंगातील लिव्हिंग रूम असून त्यात आयव्हरी रंगाचे सोफे आणि सुसंगत सजावट पाहायला मिळते. डायनिंग एरियात कुटुंबीय आणि पाहुण्यांसाठी आरामदायी वातावरण तयार करण्यात आलं आहे.

8 / 9
विशेष म्हणजे घरातील प्रत्येक खोलीची सजावट एकसारखी नाही. काही भागात हलके आणि शांत रंग वापरण्यात आले आहेत, तर काही खोल्यांमध्ये गडद तपकिरी रंगसंगतीमुळे वेगळा मूड तयार होतो. अशा प्रकारे ‘शिवशक्ती’मध्ये आलिशानपणासोबत घरगुतीपणाचाही अनुभव मिळतो.

9 / 9
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...