
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रेल्वे प्रशासनाने तिकीट आणि पास बुकिंगच्या नियमात मोठे बदल केले आहेत.

रेल्वेने आता सर्व डिजिटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या उद्देशाने रेल वन (Rail One) हे नवीन अधिकृत ॲप सुरू केले आहे. यामुळे UTS (Unreserved Ticketing System) ॲपवरून मासिक पास काढण्याची सुविधा आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

प्रवाशांना आता रेल वन या नवीन ॲपचाच वापर करुन नवा पास काढावा लागणार आहे. जर तुम्हालाही मुंबई लोकलचा नवीन पास काढायचा असेल, तर यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा. यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून Rail One हे अधिकृत ॲप डाऊनलोड करा.

हे ॲप उघडल्यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती भरून नवीन खाते तयार करा किंवा त्याखाली असलेल्या युटीएस किंवा IRCTC चा पर्यायही तुम्ही वापरु शकता. ही नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करा.

लॉगिन झाल्यावर तुमच्या स्क्रिनवर तुम्हाला Reserved Unreserved आणि Platform असे तीन पर्याय दिसतील. यातील Unreserved या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्यावर तुम्हाला Normal आणि Season असे दोन पर्याय विचारले जातील. यातील Normal हा पर्याय लोकल तिकिटांसाठी आहे. तर Season हा पर्याय पासधारकांसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे पास काढणाऱ्यांनी Season हा पर्याय निवडावा.

यानंतर त्याखालीच तुम्हाला Issue आणि Renew असे दोन पर्याय दिसतील. यात जर तुम्हाला नवीन पास काढायचा असेल तर Issue वर क्लिक करावे लागेल. जर तुम्ही दररोज ठराविक प्रवास करत असाल आणि त्याचा पास दर महिन्याला काढत असाल तर तुम्हाला Renew हा पर्याय वापरावा लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला कुठून कुठे जाण्यासाठी पास काढायचा आहे, त्या स्टेशनचे नाव सिलेक्ट करावे लागेल. यानंतर तुम्ही Proceed to book हा ऑप्शन सिलेक्ट करा.

यानंतर तुमच्यासमोर ट्रेन टाईप म्हणजेच साधी लोकल, एसी लोकल, मेल/एक्सप्रेस असे पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडा. तसेच तुमच्या पासचा कालावधी (Monthly/Quarterly) निवडा आणि त्यासोबतच फर्स्ट क्लास की सेकंड क्लास याची निवड करा.

यानंतर खाली तुम्हाला तुमचे नाव, पत्ता दिसेल. सर्व तपशील तपासल्यानंतर UPI, नेट बँकिंग किंवा आर-वॉलेट (R-Wallet) द्वारे पेमेंट करा. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमचा डिजीटल पास ॲपमध्ये जनरेट होईल. तो तुम्ही My Booking मध्ये जाऊन पाहू शकता.