
जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही महिन्यापासून परभणी आणि नांदेडचे प्रवासी या गाडीची वाट पाहत होते. जाणून घ्या ही गाडी कधीपासून सुरू होणार आणि याचे संपूर्ण वेळापत्रक.

नांदेड मुंबई वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून सुरू होतंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी 1.10 ला निघणार आहे आणि नांदेडला रात्री 10.50 ला पोहचेल.

मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून निघेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या स्थानकांवर ही गाडी थांबेल.

ही गाडी अगोदर जालन्यापर्यंत चालत होती. मात्र, आता तिच विस्तार करण्यात आला असून ती नांदेडपर्यंत धावणार आहे. ही गाडी परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी चांगली ठरणार आहे.

सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर रिपोर्टनुसार, एसी चेअर कार 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार 3,300 रुपये याप्रमाणे. परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल. या गाडीची विशेष बाब म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळात नांदेडहून मुंबईला येऊ शकता. वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा देखील मिळतात. परभणी नांदेडमध्ये पहिल्यांदाच ही गाडी धावणार आहे.