Photos : एक्सप्रेस वे नंतर मुंबईकडे येणारा आणखी एक महामार्ग ठप्प; रस्ते वाहतुकीचे तीन तेरा

मुंबई-नाशिक महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात झाल्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

| Updated on: Feb 05, 2026 | 1:47 PM
1 / 6
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीची समस्या ताजी असताना मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

2 / 6
नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर एका अवजड वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गिकेवर एका अवजड कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला गेला गेला आहे.

4 / 6
या अपघातामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे कार्यालयीन वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असल्याने या कोंडीत अधिकच भर पडली आहे.

5 / 6
विशेषतः ठाण्यातील साकेत पूल आणि रुस्तमजी गृहसंकुल परिसरात परिस्थिती अधिक बिकट आहे. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

6 / 6
त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा किंवा प्रवासाचे नियोजन थोडे उशिरा करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Follow Us