
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस दिवस उरलेत. सर्वांजण ज्याची उत्सुकतेनं वाट पाहत असतात. त्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.

19 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पुर्वी लालबागच्या राजाचा पहिला फोटो समोर आला आहे.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर होते. लालबागच्या राजाचं हे रूप पाहून भाविकांमध्ये उत्साह संचारला.

लालबागच्या राजाचं हे पहिलं रूप अनेकांनी आपल्या डोळ्यात साठवलं. तर काहींना हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरला नाही.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत.